• पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांची प्रसारमाध्यमांना माहिती 

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एफडीसी रुद्रण्णा यादवण्णावर यांच्या आत्महत्येबाबतची सर्व माहिती ब्लॅकआउट करण्यात येत आहे. रुद्रण्णाचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्याचे, शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन म्हणाले, ते आज बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

बेळगाव तहसीलदार कार्यालयातीलएफडीसी रुद्रण्णा यादवण्णावर यांच्या आत्महत्येबाबतची सर्व माहिती ब्लॅकआउट करण्यात येत आहे. रुद्रण्णाचा मोबाईल फोन यापूर्वीच जप्त करून फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला आहे. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये काय चर्चा झाली होती? ते कोणाशी बोलले होते पोलीस  याची माहिती घेत आहेत. आरोपी फरार झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासानंतरच खरे कारण समोर येईल, असे त्यांनी सांगितले. आरोपींच्या अटकेबाबत कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या दबावाला बळी न पडता पोलीस विभाग अत्यंत पारदर्शकपणे तपास करत असल्याचे ते म्हणाले.