बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि नंदादीप नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या गुरुवार दि. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर नेत्र तपासणी शिबिर नंदादीप नेत्र रुग्णालय खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव येथे सकाळी १०.३० वा. सुरू होणार आहे. तरी डोळ्यांशी संबंधित समस्येने त्रस्त असलेल्या शहरातील महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments