- मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असून महिला बालविकास मंत्री पदाची जबाबदारी असताना कामाच्या दबावाला न जुमानता या क्षेत्राच्या विकासासाठी रात्रंदिवस झटत असल्याचे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते मंगळवारी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. शेतातील विकासकामे कोणत्याही कारणाने खोळंबली जाऊ नयेत, हा माझा मानस असल्याचे त्या म्हणाल्या.
- सावगाव येथे काँक्रीट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन पूजन :
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सावगाव गावात काँक्रीट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री महोदयांनी सांगितले, स्थानिकांचा सल्ला घेऊन ठेकेदाराला विहित मुदतीत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांसह अनेकांची उपस्थिती होती.
- सावगाव येथे नवीन अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन :
बेळगाव ग्रामीण मतदार संघातील सावगाव येथे नवीन अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचे स्थानिकांच्या उपस्थितीत मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, विभागाचे उपसंचालक नागराज, सीडीपीओ सुमित्रा यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
- संतीबस्तवाड येथे काँक्रीट रस्ता बांधकामास सुरुवात :
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते संती बस्तवाड गावात काँक्रीट रस्ता बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन गावातील गाऱ्हाणी, जनतेच्या समस्या ऐकून घेत विकासकामांबाबत चर्चा केली. यानंतर मंत्री महोदयांनी संती बस्तवाड गावातील विकासाधीन असलेल्या श्री सातेरी मंदिराच्या बांधकामाची पाहणी करून बांधकामाची माहिती घेतली.
यावेळी युवराज कदम, देमन्ना नायक, बासू भिरमुट्टी, आसिफ तहसीलदार, अजय चन्नीकुप्पी, सातेरी गुरव, अनिल कार्लेकर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments