बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एफडीसी रुद्रण्णा यादवण्णावर यांच्या आत्महत्येप्रकरणी बेळगावच्या खडेबाजार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिन्ही आरोपी मोबाईल बंद करून फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
आत्महत्या केलेल्या रुद्रण्णाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून खडेबाजार पोलिसांनी बेळगावचे तहसीलदार बसवराज नगराळ, अशोक कबलीगार आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पीए सोमू या तिघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
रुद्रण्णाने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या मेसेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आत्महत्येच्या दिवशी कार्यालयात असलेले तहसीलदार बसवराज नगराळ हे पळून गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर पीए सोमू आणि अशोक कबालिगर हे ए2 आणि ए3 आरोपी आहेत आणि तहसीलदार बसवराज नगराळ हे ए1 आरोपी आहेत कारण या तिघांनी रुद्रण्णाचा छळ केला. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पीए सोमू यांनी रुद्रण्णा यांच्याकडून दोन लाख घेतले आणि त्यांची बदली रद्द केली नाही. मागणीनुसार विभागाची जबाबदारी न देता बदली करण्यात आल्याने रुद्रण्णा यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. आरोपींना अटक करावी, लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि रुद्रण्णा आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, या मागणीसाठी भाजप नेत्यांनी आज बेळगावात जोरदार निदर्शने करून तपासाला गती दिली आहे.
0 Comments