बेळगाव / प्रतिनिधी 

तांगडी गल्ली येथील कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या खालील बाजूस असणाऱ्या रस्त्याच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्याहस्ते रस्ते विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. येथील रस्त्याची झालेली दुरावस्था लक्षात घेत स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी रस्त्यांच्या विकासकामांची मागणी केली होती. मागणीनुसार येथील कामाचा प्रारंभ करण्यात आला असून यासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून येथील रस्त्याचा विकास होणार आहे.

यावेळी अमन सेठ, सिद्धार्थ भातकांडे, कपिल भोसले, महेश लगाडे, इंद्रजित जाधव, रामा मेस्त्रीअड्डा महिला मंडळ, तांगडी गल्ली येथील महिला मंडळ, व्यापारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.