• अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

अथणी / वार्ताहर 

अथणी तालुक्यातील शिवनूर क्रॉसजवळ दोन दुचाकींमध्ये अपघात झाला असून, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी दुचाकीस्वार अथणी तालुक्यातील नागनूर पी.ए. आणि पार्थनहळ्ळी गावातील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, शिवनूरू - तेवरटी मार्ग ओलांडताना हा अपघात झाला. तिथे एक सर्कल आहे जिथे चार मार्ग परस्परांना जोडतात. मात्र, या ठिकाणी कोणताही अपघातसूचक सिग्नल्स किंवा सुरक्षा सूचना दिली गेली नाही.  ज्यामुळे अपघात झाला, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

एकाच आठवड्यात तीन अपघात घडल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे. त्यामुळे, स्थानिक नागरिकांनी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना यावर लक्ष देण्याची मागणी केली आहे.