नवजात अर्भकाला कालव्यात फेकल्याची अमानुष घटना कागवाड तालुक्यातील कौलगुड्ड - मोळे मार्गावरील बोरगाव मळ्यानजीक उघडकीस आली.
शुक्रवारी कौलगुड्ड - मोळे मार्गावरील बोरगाव मळ्याजवळ शेतात कामासाठी गेलेल्या मजुराला ऐनापूर एटा पाटबंधारे कालव्यात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ गावातील प्रमुख व्यक्ती व कागवाड पोलिसांना या घटनेची माहिती दिली. राज्याच्या सीमेवर आणखी एका धक्कादायक घटनेने जनता हादरली असून, तीन-चार दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाला अज्ञातांनी कालव्याच्या पाण्यात फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळी बालविकास अधिकारी संजीवकुमार सदलगे, कागवाड पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक जी. बिरादर यांनी भेट देऊन तपासणी केली. अथणीचे डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी आणि पोलिस निरीक्षक संतोष हळ्ळूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
0 Comments