बेळगाव / प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानामध्ये कार्तिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या कार्तिकोत्सवाचे यंदाचे 65 वे वर्ष असून उद्या रविवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता कार्तिक उत्सव पार पडणार आहे.
त्यानिमित्त सकाळी ८ वाजता होम हवन, ९ वाजता लघुरुद्राभिषेक, ११ वाजता सत्यनारायण पूजा, १२ वाजता महाआरती करण्यात येणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता कार्तिकोत्सव पार पडणार आहे त्यानंतर ८ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी बेळगावसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments