- शिरोड्यात कार्यक्रमाचे आयोजन
बेळगाव : ग्रामपंचायत अध्यक्ष डॉ. वाय. एम. पाटील यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी शिरोड्यातील शिवनाथ हॉल या ठिकाणी एका शानदार कार्यक्रमांमध्ये समाजभूषण पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.
गोवा येथील शिक्षक विकास परिषद या संस्थेकडून बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अध्यक्ष डॉ. वाय. एम. पाटील यांच्या आजपर्यंत केलेला सामाजिक कार्याची दखल घेत उत्कृष्ट समाजकार्य केल्याबद्दल त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
आजपर्यंत डॉ. वाय. एम. पाटील यांना त्यांच्या समाजिक कार्याबद्दल आदर्श सरपंच सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.गोवा येथील शिक्षक विकास परिषद समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार जाहीर करते.
0 Comments