• हृषिकेश सोनवणे यांची बदली 

विजयपूर : राज्य सरकारने आयपीएस अधिकारी लक्ष्मण निंबरगी यांची विजयपूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्याचा आदेश जारी केला आहे. सरकारने आज जारी केलेल्या ७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली आदेशात लक्ष्मण निंबरगी यांची बदली करण्यात आली आहे. 

लक्ष्मण निंबरगी २०१४ बॅचचे आयपीएस अधिकारी असून मूळचे विजयपूर जिल्ह्याच्या इंडी तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावचे रहिवासी आहेत. उडुपी, बेळगाव, बळ्ळारी आणि सीसीबी येथेही त्यांनी सेवा बजावली आहे. आता विजयपूर जिल्हा  पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. माजी जिल्हा पोलीस अधीक्षक हृषिकेश सोनवणे यांची बदली झाल्यानंतर प्रसन्न देसाई हे प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक होते.