बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने हिंदुहृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज रविवारी गांभीर्याने आचरणात आणण्यात आला.
रामलिंग खिंड गल्ली येथील शिवसेना कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, तालुकाप्रमुख सचिन गोरले, माजी नगरसेवक नेताजी जाधव शुभम शेळके, चंदू पाटील, महेश टंकसाळी मनोज पावशे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments