• मंत्री सतीश जारकीहोळी

बेळगाव / प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नसतानाही महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात १ नोव्हेंबर रोजी काळ्या दिनी मूक सायकलफेरी काढली. यावर सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी झालेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे वक्तव्य  केले.

शुक्रवारी बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले , महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची गरज नाही. ते फक्त नावात आहे. वर्षातून एकदा समितीला काळा दिवस आठवतो. बंदी घालण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले. महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घातल्यास लढा पुन्हा आक्रमक होईल. त्यामुळे त्यावर बंदी घातली जाणार नाही, असे ते म्हणाले.