बेळगाव / प्रतिनिधी
हुबळी दंगल प्रकरणात काँग्रेस सरकार राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार न करता केवळ व्होट बँकेच्या राजकारणासाठी खटला मागे घेत आहे. सरकारने आपला निर्णय त्वरित बदलावा, असे भाजपचे प्रदेश प्रवक्ते ॲड.एम.बी.जिरली म्हणाले.
आज बेळगाव येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून कर्नाटक सरकार हुबळी दंगल प्रकरण मागे घेत आहे. हे कायद्याच्या विरोधात आहे. सरकार दंगलीच्या बाबतीत व्होट बँकेचे राजकारण करत आहे, हे योग्य नाही. त्यामुळे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा. सरकार फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबत आहे. काँग्रेसला राज्याची आणि देशाची चिंता नाही. मुडा घोटाळ्यात राज्यपाल आणि संविधानाच्या विरोधात सरकार काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी प्रदेश भाजप उपाध्यक्ष अनिल बेनके, अधिवक्ता रमेश देशपांडे आणि भाजप विधी आयोगाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments