• एकाच टप्प्यात पार पडणार निवडणुका 

दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या. 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे. 

  • असे असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीचे वेळापत्रक : 
  • निवडणुकीचं नोटिफिकेशन :  22 ऑक्टोबर 2024
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 
  • अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
  • अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर 
  • मतदान  : 20 नोव्हेंबर 2024
  • मतमोजणी : 23 नोव्हेंबर  2024

  • 288 जागांसाठी मतदारांची संख्या :
  • एकूण मतदार - 9 कोटी 63 लाख
  • नव मतदार - 20.93 लाख
  • पुरूष मतदार - 4.97 कोटी
  • महिला मतदार - 4.66 कोटी
  • युवा मतदार - 1.85 कोटी
  • तृतीयपंथी मतदार - 56 हजारांहून जास्त
  • 85 वर्षावरील मतदार - 12. 48 लाख
  • शंभरी ओलांडलेले मतदार - 49 हजारांहून जास्त
  • दिव्यांग मतदार - 6.32 लाख


  • महाराष्ट्रात किती मतदान केंद्रांची संख्या 
  • एकूण मतदान केंद्र - 1 लाख 186 
  • शहरी मतदार केंद्र - 42,604 
  • ग्रामीन मतदार केंद्र - 57,582 
  • महिला अधिकाऱ्यांची केंद्रे - 
  • एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार - 960

  • राज्यातील मतदारांची संख्या : 
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी राज्यात पुरुष मतदार 4.95 कोटी आणि स्त्री मतदार 4.64 कोटी आहेत. थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 56,997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नवमतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत.