• कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात यावी, या मागणीसाठी कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

२०२४-२९ या कालावधीसाठी निवडणुकीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. ९ ऑक्टोबरपासून विविध स्तरांच्या निवडणुकांना सुरूवात झाली असून २८ ऑक्टोबर रोजी जिल्हा शाखा कार्यकारी समिती संचालकांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, बेळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या प्राथमिक शाळा शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी आजतागायत प्रसिद्ध झालेली नाही. मतदार यादी तातडीने प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात या निवेदनात करण्यात आली आहे.