बेळगाव / प्रतिनिधी
हिंडलगा कारागृहात, जन्मठेपेची शिक्षा भॊगणाऱ्या एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान या कैद्याचा जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. गिरीश (रा. बेल्लारी) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव असून बेळगाव हिंडलगा कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
गिरीश कोठडीत गळफास घेत असल्याचे सहकारी कैद्यांच्या लक्षात आले असता त्यांनी तातडीने कारागृह अधिकाऱ्यांना माहिती दिली.
यानंतर उपचारासाठी गिरीशला रुग्णवाहिकेतून बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार यशस्वी न झाल्याने आज त्याने अखेरचा श्वास घेतला. अद्याप त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
0 Comments