बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरातील अमन नगर येथे शॉर्टसर्किटमुळे घर पूर्णपणे जळून खाक झाले. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. अमननगर येथील अयाज मुल्ला यांच्या घरातील सर्व सदस्य बेडरूममध्ये असताना अचानक आग लागली. पाहता पाहता संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले. यामध्ये घरातील सर्व पैसे, धन -धान्य, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. 

आग लागल्याचे समजताच तात्काळ घरातील सर्व सदस्य बाहेर धावले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र घर आगीत जळून खाक झाल्याने मुल्ला कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. आगीच्या दुर्घटनेत घरातील सर्व सामान जळून खाक झाले. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न करून अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली.