बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव बीम्स रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांत ४१ बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी शासनाने गांभीर्याने घेतली असून शासनाने स्थापन केलेले विशेष तपास पथक उद्या बेळगाव बीम्स रुग्णालयात येऊन तपास करणार आहे.

बेळगाव जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांत ४१ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याचा गांभीर्याने विचार करून महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बीम्सच्या संचालकांना जाब विचारला आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. आता सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, सरकारने स्थापन केलेले विशेष तपास पथक सोमवारी सकाळी 6.30 वाजता बेळगावात येणार असून, बीम्स रुग्णालयात तपास करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.