बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक राज्य सॉफ्ट बॉल  क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयपीएल मॉडेलवर गल्ली क्रिकेट स्पर्धा सुरू झाली असून बेंगळुरू येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी बेळगावच्या संघाची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती गंगाधर राजू यांनी दिली.

आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हि माहिती दिली. आयपीएल मॉडेलवर गल्ली क्रिकेट स्पर्धा सुरू झाली असून १ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत एसएमटी नागरत्नम्मा स्टेडियम, सोलदेवनहळ्ळी, बेंगळुरू येथे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी बेळगावच्या संघाची निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी होणार असून खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे. सर्व खेळाडूंना मानधन देण्यात येणार असून बेळगावमधून 20 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.