बेळगाव : येळ्ळूर केंद्रातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेल्या सर्व शिक्षकांचा सत्कार आणि केंद्रात नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा सन्मान येळ्ळूर केंद्राच्या वतीने मंगळवार दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी बी.आर.सी.प्रमुख डॉ.एम.एस.मेदार सर, केंद्रप्रमुख महेश जळगेकर, मॉडेल शाळेचे मुख्याध्यापक आर.एम.चलवादी, येळ्ळूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक एम.बी.पाटील सर, कन्नड येळ्ळूरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अळणावर मॅडम, समिती शाळेच्या मुख्याध्यापिका एस.व्ही.सांबरेकर मॅडम,उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका मनियार मॅडम, सुळगा शाळेच्या मुख्याध्यापिका नाईक मॅडम, राजहंसगडचे मुख्याध्यापक श्री.गुरव सर तसेच केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मॉडेल स्कूलच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीतेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री महेश जळकेकर यांनी केले. त्यानंतर शासनामार्फत आणि वेगवेगळ्या संघ संस्थेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर केंद्रामध्ये नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर डॉ. एम. एस. मेदार सरांनी शिक्षकांना एफ.एल.एन. बद्दल मार्गदर्शन केले. ह्या पुरस्काराच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या कार्याची पोच पावती मिळते असे त्यांनी सांगितले. श्रीमती कडबी आणि श्रीमती मंडोळकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस.बी.पाखरे यांनी केले. तर एम.एल. हंडे यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments