बेळगाव / प्रतिनिधी
गोव्याहून हावेरीला विनापरवाना मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनासह एकूण ३ लाख १९ हजाराचा मद्यसाठा जप्त करण्याची कारवाई अबकारी विभागाने रविवारी सकाळी केली. जमील निजामुद्दीन शिरहट्टी (वय ४८) (रा. हावेरी ता. हावनूर) असे या कारवाईत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सदर व्यक्ती केए १७ - डी ३५७७ क्रमांकाच्या वाहनामधून गोव्यातून हावेरीला विनापरवाना मद्य वाहतूक करत होता. यावेळी अनमोड चेक नाक्यावर अबकारी विभागाने हे वाहन अडवून झडती घेतली असता, त्यामध्ये बुलेट ७७, केशु फेणी ७५० ml च्या २४ आणि १८०ml च्या ४८ बॉटल, प्रीमियम केशु फेणी ७५०ml च्या 12 रॉयल स्टॅक ७५०ml च्या ४ सिग्नेचर व्हिस्की ७५० ML-७ लेमन मोमेंट ऑफ मॅजिक १ बॉटल अशी एकूण १९ हजाराची दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मंगळूर विभागाचे सहआयुक्त यांच्या आदेशानुसार उपायुक्त उत्तर कन्नड जिल्हा यांच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूरचे उपअधिक्षक यांच्या सूचनेनुसार अबकारी विभागाचे निरीक्षक उपनिरीक्षक व त्यांच्या सहकऱ्यानी ही कारवाई केली.
0 Comments