• शंभर किलो फटाके जप्त 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरात अवैध फटाके विक्री दुकानांवर छापा टाकून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी १०० किलो अवैध फटाके जप्त केले.  

प्रदूषण नियंत्रण कायदा १९८१ , १९८३ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. प्रदूषणमुक्त फटाक्यांच्या वापराबद्दल जागृती आणि पर्यावरण प्रदूषण नियंत्रणासाठी, बेळगाव महापालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांच्या नेतृत्वाखाली, आरोग्य अधिकारी आणि आरोग्य निरीक्षकांच्या पथकाने बेळगावच्या रविवार पेठेतील फटाक्यांच्या दुकानावर छापा टाकला. या छाप्यात सुमारे १०० किलो अवैध फटाके जप्त करण्यात आले.