- अपघातात विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
- जांबोटीनजीक आमटे गावाजवळ घटना
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील जांबोटी नजीक आमटे गावाजवळ कंटेनर व दुचाकीच्या अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
निखिल बाबागौडा पाटील (वय १९)असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावातील रहिवासी आहे. बेळगाव येथील जीआयटी महाविद्यालयात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले. आणखी एक विद्यार्थी मुडलगी येथील निखिल रमेश बेलागौडा हा गंभीर जखमी झाला आहे.
आज वाल्मिकी जयंतीनिमित्त महाविद्यालयाला सुटी असल्याने हे दोघे विद्यार्थी दुचाकीवरून गोव्याला जातेवेळी जांबोटीजवळ समोरून येणाऱ्या कंटेनर वाहनाची धडक बसल्याने सदर अपघात घडला.
खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, पीएसआय गिरीश एम. यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. यानंतर झालेल्या अपघाताचा पंचनामा करून यानंतर झालेल्या अपघाताचा पंचनामा करून अपघाताचा गुन्हा खानापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला. जखमीला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेहावर जिल्हा इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
0 Comments