बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात एका अंडरट्रायल कैद्यावर अन्य कैद्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी उशिरा उघडकीस आली. जखमी कैद्याला पुढील उपचारासाठी हुबळी किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हितेशकुमार चौहान (मूळचा बिहार सध्या रा.रामतीर्थनगर, बेळगाव) असे मारहाण झालेला कैद्याचे नाव आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेशकुमार चव्हाण याला आर्थिक व्यवहाराशी संबंधित दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली.

त्याच दिवशी सायंकाळी कारागृहाच्या कॅन्टीनसमोरून पायी जात असताना कैद्यांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याला जखमी केले. या घटनेत हितेश कुमार गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी हुबळी किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.