• १२ ज्योतिर्लिंगांच्या पदयात्रेद्वारे तरुणाकडून जनजागृती 

बेळगाव / प्रतिनिधी 

जन्म देणारे आई-वडील देवासारखे असतात. पण सध्याच्या पिढीतील अंतर आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नाती तुटली असून त्यांनी बांधलेल्या घरात मुले राहत आहेत आणि  पालकांना वृद्धाश्रमात ठेवले जात आहे. पण इथे एक व्यक्ती १२ ज्योतिर्लिंग पायी चालत याविरोधात जनजागृती करत आहे. पाठीवर बॅग...डोळ्यांवर चष्मा. साध्या स्वभावाच्या या माणसाने १२ ज्योतिर्लिंगांची पदयात्रा काढून जवळपास २ वर्षे झाली आहेत.याबद्दलची ही विशेष बातमी वाचा सविस्तर... 

प्रत्येकजण स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी देवाची उपासना करतो. मात्र, त्याच्या भ्रमंतीचा हेतू वेगळा आहे. देश आणि समाजातील मुलांचे आई - वडीलांशी तुटत चाललेले नाते अधिक दृढ करण्यासाठी या तरुणाने पदयात्रा काढली आहे.

दिनेश भरमा बोराशे असे त्याचे नाव आहे. तो महाराष्ट्रातील खानदेशातील धुळे तालुक्यातील आहे. सन २०२२ साली महाशिवरात्रीला त्याने पदयात्रा सुरू केली असून याआधी १२ पैकी १० ज्योतिर्लिंग पाहिले आहेत. अलिकडच्या आधुनिक युगात विभक्त कुटुंबे अधिक सामान्य झाली आहेत. गरीब घरातील मुलांसाठी, वृद्धाश्रमात प्रवेश करणाऱ्या पालकांसाठी, मानवजातीला जडलेली ही वाईट परंपरा दूर होऊ द्या. प्रत्येकाला नातेसंबंधांची मूल्ये समजावीत यासाठी दिनेशने ज्योतिलिंग पदयात्रा सुरू केली. तामिळनाडूतील रामेश्वरम येथून आज बेळगावात आलेला दिनेश दररोज २० ते ६० किमी चालतो. आता त्यांने बेळगाव ते पुणे आणि तेथून भीमाशंकर असा प्रवास वाढवला आहे.

खरंच दिनेशचा संकल्प नाविन्यपूर्ण आहे. त्याचा प्रवास पूर्णत्वास जाईल, अशी आशा बेळगावच्या जनतेला आहे.