चिक्कोडी / वार्ताहर
विहिरीत पडलेल्या म्हशीला चिक्कोडी अग्निशामक दलाने बाहेर काढल्याची घटना घडली आहे. चिक्कोडी तालुक्याच्या केरुर गावातील कुंभार क्रॉसजवळ याच गावातील शेखर मलगौडा पाटील यांची एक म्हैस खोल विहिरीत पडली होती. यानंतर लागलीच चिक्कोडी अग्निशामक दलाला कळविण्यात आले. माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन म्हशीची सुटका केली. या बचाव कार्यात एस. एन. निंगनूरी, रचैया मठपती, एल.एस.शिरागमवी, रूपेश किल्लिकेट्टा, बसवराज हिरेगौडर, बसवराज कांबळे, उमेश नेर्लिकर व कर्मचारी सहभागी झाले होते.
0 Comments