• तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक 

बेळगाव : सुळगा (हिं). येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवी त शिकणारी विद्यार्थीनी कु.तनया जोतिबा चलवेटकर हिची बुद्धीबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

नुकत्याच मच्छे येथे तालुकास्तरावर झालेल्या बुद्धीबळ स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका विजया नाईक, मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका संगीता कुडची, तसेच शाळा सुधारणा कमिटीचे सर्व पदाधिकारी, पालक यांनी प्रोत्साहन दिले आहे. या गुणवंत खेळाडूचे सर्वत्र कौतुक होत आहे.