नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांची बेळगावचे लोकसभा खासदार जगदीश शेट्टर यांंनी आज नवी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीप्रसंगी सध्या बेंगळूर - धारवाड दरम्यान धावणारी वंदे भारत हायस्पीड ट्रेन बेळगाव शहरापर्यंत विस्तारित करण्याच्या आवश्यकतेवर चर्चा केली.
पुणे - बेळगाव - हुबळी दरम्यान भारतातील नवीन हायस्पीड ट्रेनने वाहतुकीला गती देऊन बेळगाव जिल्ह्यातील रहिवाशांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण केली आहे. त्याचबरोबर सध्या बेंगळुरू ते धारवाड दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन सेवा बेळगाव पर्यंत वाढवण्याच्या गरजेबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. तसेच सौंदत्ती श्री रेणुका यल्लम्मा देवस्थानसाठी बेळगाव जिल्ह्यात नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची गरज असून या मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासनही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे, असे बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
0 Comments