• सुमारे १ लाखांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास 

अथणी / वार्ताहर  

बेळगाव जिल्ह्याच्या अथणी शहरातील  कृष्णा परिसरात मंगळवारी रात्री उशिरा चोरट्यांनी १२ हून अधिक घरफोड्या करून सुमारे १ लाखांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा आरोप शहरवासियांनी केला आहे. सदर घटना अथणी पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली असून या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  या घरफोड्यांमध्ये सुमारे ५ ते ६ जणांची टोळी सक्रिय असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.