बेळगाव / प्रतिनिधी
उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बेकायदा रस्त्यांच्या बांधकामाबाबत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणाऱ्या बेळगाव महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांचे कौतुक केले आहे. बेळगावचा जुना पीबी रोड ते बँक ऑफ इंडिया हा रस्ता भूसंपादन न करताच बांधण्यात आला होता. ही जमीन मूळ मालकाला परत करून कागदपत्रे जमा करण्याबाबत मा. उच्च न्यायालयाने बेळगाव महापालिकेला सोमवारपर्यंतची मुदत दिली होती.
बेळगाव महापालिकेच्या आयुक्तांनी काल सोमवारी मूळ मालकाला जमीन परत करण्याबाबत उच्च न्यायालयात कागदपत्रे दाखल केल्याच्या निमित्ताने मा. उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांच्या न्यायाबद्दल कौतुक केले आहे.
अधिकाऱ्यांनी तोंडी आदेशाचे पालन केले तर रस्त्यांच्या कामांचा तोटा अधिकाऱ्यांनी सहन करावा, हे योग्य नाही. याप्रकरणी न्यायालयाच्या निर्देशांचे प्रशासनाने पालन केले आहे. न्यायालयीन पुनर्विलोकननंतर ते येथे प्रकरण बंद करतील, असे न्यायालयाने सांगितले.तोटा कोणी सहन करायचा याचा निर्णय महामंडळाचे संचालक मंडळ घेईल, असे उच्च न्यायालयाने सांगितले.
0 Comments