- कोंडुसकोप्प येथील घटना
बेळगाव / प्रतिनिधी
समुदाय भवनच्या जागेच्या कारणावरून बेळगाव तालुक्यातील बस्तवाड गावचे उपाध्यक्ष विठ्ठल सांबरेकर यांच्यासह चौघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना गुरुवारी कोंडुस्कोप्प गावात घडली.
जखमी विठ्ठल सांबरेकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हिरेबागेवाडीचे पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. समुदाय भवनची जमीन सांबरेकर कुटुंबीयांची आहे. दुसरीकडे गावातील नागरिकांच्या संमतीने पंचायतीची जमीन मिळवलेल्या विठ्ठल सांबरेकर यांच्यावर काहींनी त्यांच्या घरी येऊन हल्ला केला.
इमारतीचे बांधकाम सुरू असताना याच गावातील पुंडलिक कुडचेकर, भीमा देमण्णावर आणि नागप्पा वलके यांनी त्यांच्यावर विटांनी हल्ला केला. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली.
0 Comments