बेळगाव / प्रतिनिधी
मुडा घोटाळ्यात अडकलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नैतिकता स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करत बेळगाव येथील जेडीएस जिल्हा युनिटतर्फे आज चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने करण्यात आली. याशिवाय जेडीएस बेळगाव जिल्हाध्यक्ष शंकर मोडलगी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत संताप व्यक्त केला.
राज्यपालांनी सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी आणि उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील आरोपांच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर हा निषेध करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा पायउतार व्हावे अशी मागणीही आंदोलकांनी केली.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना जेडीएस नेते मारुती अष्टगी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विलंब न करता राजीनामा द्यावा असा आग्रह धरला. न्यायालयाचा निकाल आणि राज्यपालांचा निर्णय हे स्पष्ट करतो की सिद्धरामय्या यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि मुख्यमंत्रीपद सोडले पाहिजे, असे ते म्हणाले.
जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत आंदोलन सुरू ठेवणारं असल्याचा इशारा जेडीएसने दिला आहे. त्यामुळे कर्नाटकातील वाढत्या राजकीय तणावात भर पडली आहे.
0 Comments