- पंत, गिल, अश्विन, जडेजा चमकले
चेन्नई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे. भारतीय संघाने तब्बल २८० धावांनी बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यात शुभमन गिल, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी चमकदार कामगिरी केली. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये रंगणार आहे.
टीम इंडियाने बांग्लादेशला विजयासाठी ५१५ धावांचे आव्हान दिले होते.बांग्लादेशचा डाव या विजयी आव्हानाच्या प्रत्युत्तरात २३४ धावांवर आटोपला. बांग्लादेशकडून कॅप्टन नजमूल हुसैन शांतो याने सर्वाधिक ८२ धावांची खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर बांग्लादेशच्या फलंदाजांना फार काही करता आले नाही. टीम इंडियाकडून लोकल बॉय आर. अश्विन याने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. तर इतरांनी त्याला चांगली साथ देत बांगलादेशला गुंडाळण्यात योगदान दिले.
अश्विनने पहिल्या डावात बॅटिंगने धमाका करत कारकीर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले. त्यानंतर अश्विनला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही.मात्र अश्विनने दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. अश्विनची ५ विकेट्स घेण्याची ही ३७ वी वेळ ठरली. अश्विनने यासह ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्न याच्या ३७ वेळा ५ विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. अश्विनला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
0 Comments