बेळगाव / प्रतिनिधी 

वीस कोटी रुपयांचे नुकसान भरपाई देण्यावरून बॅक फुटवर असलेल्या बेळगाव महापालिकेने केवळ विकास कामे नव्हे तर जनतेच्या मूलभूत सुविधांकडे देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. 

बेळगाव शहरातील शहापूर स्मशानभूमीची दुरावस्था पाहिली असता बेळगाव महापालिकेने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे जाणवते. या स्मशानभूमीतील शेडच्या पत्र्यांची अवस्था दयनीय झाले असून गळत्या तर आहेत. मात्र सदर पत्रे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. जोवर अंतिम संस्कारला गेलेला व्यक्ती कोणी जखमी होत नाही तोवर प्रशासनाला जाग येणार नाही का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. महापालिका प्रशासन याकडे लक्ष देईल का? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.