बेळगाव / प्रतिनिधी
अलतगा कंग्राळी खुर्द भागातील नाल्यामध्ये दोन दिवसांपूर्वी पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री फंडातून ५ लाखाचा धनादेश देण्यात आला. ओंकार अरुण पाटील हा आपल्या भावासह दुचाकी वरून जात असताना नियंत्रण सुटल्याने नाल्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या तरुणाच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पूरग्रस्त फंडातून ५ लाखांची मदत केली. बेळगाव जिल्ह्यातील पुराचे निरीक्षण करून परत जाताना मुख्यमंत्र्यांनी विमानतळावर मृत ओंकारची आई सुरेखा पाटील यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला. बेळगाव जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून ही मदत देऊ करण्यात आली. यावेळी तहसिलदार, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
0 Comments