- कोयना धरणातून आज ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
चिक्कोडी / वार्ताहर
महाराष्ट्रातील घाट भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आज शुक्रवारी सकाळी कोयना धरणातून ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
कोयना धरणाच्या ६ दरवाजातून पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी कृष्णा नदीच्या पाण्याची आवक वाढणार आहे. एकूण १०५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात आता ८५ टीएमसी पाणीसाठा आहे.
0 Comments