• महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची सर्वेक्षकांना सूचना 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अखत्यारीतील काही सार्वजनिक जागा व मालमत्ता महापालिका ताब्यात घेणार असून, सर्वेक्षण न झाल्यामुळे हस्तांतर प्रक्रियेत अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सर्वेक्षकांना तातडीने कच्चे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते, मात्र योग्य नकाशा नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि महापालिका यांची संयुक्त बैठक होणार असून, त्यादृष्टीने गुरूवारी सायंकाळी बेळगाव महापालिकेत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अखत्यारीतील जमिनी व घरांचे तातडीने कच्चे सर्वेक्षण करून अहवाल देण्याच्या सूचना सर्वेक्षकांना दिल्या. 

या बैठकीला महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी, कॅन्टोन्मेंट बोर्डचे सचिव महेश जे. उपस्थित होते.