बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तिसरे रेल्वेगेट ओव्हर ब्रिज रस्त्याच्या डागडुजीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे.
अलिकडेच प्रसारमाध्यमांनी बेळगाव तिसरे रेल्वेगेट ओव्हर ब्रिज रस्त्याची दुरवस्था आणि त्यामुळे लोकांना होणाऱ्या समस्यांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गुरुवार (दि. १) ऑगस्ट रोजी स्वत: तिसऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिजला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर कामाला सुरुवात झाली आहे.
बेळगावचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे स्थानिकांनी कौतुक केले आहे.
- या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.. 👇
0 Comments