बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहर व उपनगरात अंमली पदार्थाची विक्री जोरात सुरू आहे. हेरॉईन विक्री प्रकरणी, टिळकवाडी पोलिसांनी शनिवारी दुपारी अनगोळ येथील पाच तरुणांना अटक केली आहे.

प्रफुल्ल गजानन पाटील (वय २५), सुशांत गोविंद कंग्राळकर (वय २६), दोघेही राहणार रघुनाथ पेठ अनगोळ, नारायण बाबुराव पाटील (वय २२), रा. मेनरोड अनगोळ, सुनील भैरू असलकर (वय २५) रा. भांदूर गल्ली अनगोळ आणि सलमान बब्बर मोकाशी (वय २४) रा. कुरबर गल्ली अनगोळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी, उपनिरीक्षणक संतोष दलवाई, त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी दुपारी ही कारवाई केली . त्यांच्याजवळून ३१५०० रुपये किमतीचे ५ ग्राम १५० मिली हेरॉईन जप्त करण्यात आले आहे . त्याचा प्रमाणे जी ए ०८ के १२८३ क्रमांकाची करावी जप्त करण्यात आली आहे. या तरुणांनी हे हेरॉईन कुठून मागवले याची चौकशी करण्यात येत आहे.