- "गोविंदा आला रे...आला" चा जयघोष !
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. रात्री गोकुळाष्टमीचा कार्यक्रम तर सकाळी जन्माष्टमीचा कार्यक्रम झाला. नंतर दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
उंच टांगलेली दहीहंडी फोडण्यासाठी जवानांच्या संघांनी आपली सर्व शक्ती आणि कौशल्य वापरले आणि उत्कृष्ट कामगिरी केली. दहीहंडी फोडण्यासाठी पिरॅमिड तयार करताना योद्ध्यांमध्ये असलेली एकजूट आणि ज्ञान वाखाणण्याजोगे होते.
0 Comments