बेळगाव : टिळकवाडी एसव्ही कॉलनी येथील रहिवासी महेंद्र बाळकृष्ण देसाई (वय ५८) यांचे शुक्रवार दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वा. हृदय विकाराने निधन झाले. दुपारी १२ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन रविवारी सकाळी ७ वा. होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे.