बेळगाव / प्रतिनिधी

राज्य सरकारने बेळगावच्या सार्वजनिक शिक्षण विभागाच्या उपसंचालक पदासह विविध पदांवरील नियुक्ती करणारा आदेश जारी केला आहे. यामध्ये सध्या बीईओ म्हणून कार्य पाहणाऱ्या लीलावती हिरेमठ यांची बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी (उपसंचालक) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते.