• अनर्थ घडण्यापूर्वी दुरुस्तीची नागरिकांची मागणी  

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावातील येडियुराप्पा मार्गावरील पथदिपांची दुरवस्था झाली असून ते धोकादायक बनले आहेत. पथदिपांच्या पॅनेलचे दरवाजे उघडे असून विजेच्या तारा लोंबकळत आहेत.

बेळगावातील येडियुराप्पा मार्गावरील पथदिपांच्या फलकांची दुरवस्था झाली आहे. दरवाजावरील सूचनांचे फलक निघून गेले आहेत. आतील विजेच्या तारा लोंबकळत आहेत. मान्सून काळात फलकांमधून बाहेर पडणाऱ्या तारांमुळे धोका निर्माण होत आहे.

रात्रीच्या वेळी रस्त्यावरून ये-जा करताना कोणी नकळत खांबाला हात लावल्यास अनर्थ घडण्याची शक्यता आहे. तेव्हा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्घटना होण्यापूर्वी ही समस्या दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.