हुबळी / वार्ताहर 

हुबळी तालुक्यातील किरेसुर गावाजवळ ओमनी कारचा टायर फुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील एका मुलासह तिघांचा मृत्यू झाला. जाफरसाब मंगलोर (वय ६०), मुस्तफा मंगलोर (वय ३६) आणि शोहेब मंगलोर (वय ६) तिघेही (रा. मंगलपुर ता. कोप्पल) येथील रहिवासी आहेत.  

या घटनेत आणखी तिघे गंभीर जखमी झाले असून जखमींना एसडीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची नोंद  हुबळी ग्रामीण पोलिस स्थानकात  करण्यात आली आहे.