कुडची येथे जॅकवेलच्या एनडीआरएफची बोट उलटली; 
सुदैवाने दुर्घटना टळली 

रायबाग : बेळगाव  जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील कुडची पूल पाण्याखाली गेला आहे. आज येथे एनडीआरएफची बोट उलटली. मात्र सुदैवाने या घटनेत  कोणतीही जीवितहानी न झाल्याने अनर्थ टळला. 

कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलमध्ये पाणी साचले आहे. आज हेस्कॉमचे कर्मचारी आणि काही लोक एनडीआरएफच्या टीमसोबत या पुलाच्या शेजारी असलेल्या जॅकवेलच्या दुरुस्तीसाठी बोटीतून जात असताना ही दुर्घटना घडली. यावेळी स्थानिक लाईनमेन आणि एक वॉटरमनही या बोटीत होते. पण बोट उलटल्यानंतर पाण्यात पडणाऱ्या लाईनमेन आणि वॉटर मेन या दोघांनीही प्रसंगावधान राखून नदी काठावरील झाडाला धरून आपला जीव वाचवला.