बेळगाव / प्रतिनिधी 

लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेळगाव सहाय्यक कार्यकारी अभियंता महादेव बन्नूर यांच्या घरावर गुरुवारी सकाळी छापा टाकला असून, त्यांनी मिळकतीपेक्षा जास्त मालमत्ता कमावल्याचा आरोप आहे.

लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर हद्दीत बन्नुर यांच्या घरावर छापा टाकला आणि प्रत्येक खोलीची तपासणी केली . महादेव बन्नूर यांच्यावर याआधी छापा टाकणारे लोकायुक्त अधिकारी या छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे गोळा करून तेथून निघून गेले होते. त्याचाच एक भाग म्हणून लोकायुक्त डीवायएसपी भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुन्हा छापा टाकला आणि सखोल तपासणी केली.

त्याचप्रमाणे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी विजयनगर येथील महादेव बन्नूर यांच्या मुलाच्या घराची झडती घेतली असता घरात रोकड, सोन्या-चांदीचे दागिने सापडले, तर बनावट सोन्याचे दागिने (रोड गोल्ड) ही सापडले. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली आहे.