•  विजयपूर जिल्ह्याच्या बबलेश्वर तालुक्यातील घटना 

विजयपूर / वार्ताहर 

साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत सुदैवाने १५ कामगार  बचावले. विजयपूर जिल्ह्याच्या बबलेश्वर तालुक्यातील कृष्णनगर येथील नंदी सहकारी साखर कारखान्यात ही घटना घडली. सदर कामगार पहाटेच्या सुमारास चहा पिण्यासाठी गेले असता बॉयलरचा स्फोट झाल्याने मोठा अनर्थ टळला. 

यापूर्वी  ४ मार्च २०२३ रोजीही कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला होता. त्यावेळी एक ठार तर ४ जण जखमी झाले होते. मात्र सुदैवाने यावेळी जीवितहानी टळली. या घटनेची नोंद बबलेश्वर पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.