खानापूर / प्रतिनिधी
लोंढ्याहून रामनगरकडे जाताना दुचाकीवरून पडल्याने एक महिला अशा कार्यकर्ता ठार झाली. लक्ष्मी झरंबेकर (वय ४५ रा. मुंडवाड ता. खानापूर) असे तिचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास रामनगरजवळील पटेल हार्डवेअर समोर हा अपघात घडला. लक्ष्मी या लोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठकीला आल्या होत्या. बैठक संपवून पुन्हा गावी जाताना, एका दुचाकीस्वाराने त्यांना लिफ्ट दिली. पण दुचाकीवरून पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने रामनगर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण अधिक उपचारासाठी बेळगावला घेऊन जात असताना, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे खानापूर सरकारी रुग्णालयात त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला. याबाबत रामनगर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून रामनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
0 Comments