- मोहम्मद रोशन बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी
बेळगाव / प्रतिनिधी
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची तातडीने बेंगलोर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सध्या हुबळी येथील हेस्कॉमचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहणारे मोहम्मद रोशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
(बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी
मोहम्मद रोशन)
मोहम्मद रोशन)
नितेश पाटील यांच्याकडे बेंगलोर येथील लघु व मध्यम उद्योग विभागाचे संचालक पद देण्यात आले आहे. मोहम्मद रोशन हे सन २०१५ च्या आयएएस कॅडरचे अधिकारी आहेत. ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.
- या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.. 👇
0 Comments