बेळगाव / प्रतिनिधी 

बाची (ता. व जि. बेळगाव) येथे मुसळधार वादळी पावसात गरीब वयस्कर शांता परशुराम गावडे यांच्या घरावर भले मोठे झाड कोसळून पाच ते दहा लाखाचे झाले नुकसान झाले आहे. घरचे छत उडून गेल्याने मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक सहाय्य करून त्यांना मदत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींनी सढळहस्ते मदत करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी प्रशासनाकडे सुद्धा मागणी केली आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवार दि. ०२ जुलै २०२४ रोजी झालेल्या पावसाने विश्रांती न घेता रात्रभर झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे विविध ठिकाणाची झाडे उन्मळून पडली. यातच पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास बाची (ता. बेळगाव) येथे वेंगुर्ला रोडवर बस थांब्यानजीक असलेल्या शांता परशुराम गावडे यांच्या घरावर झाड कोसळले आणि मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले. घटना घडली त्या रात्री घरातील सर्व मंडळी गाढ झोपेमध्ये होती. मात्र दैव बलवत्तर म्हणून घरातील कोणालाही दुखापत झाली नसून जीवितहानी टळली.  

गरीब होतकरू प्रामाणिकपणे अतिशय कष्टाने जीवन जगणाऱ्या वयस्कर आजीबाई शांता परशुराम गावडे या अतिशय परोपकार करणाऱ्यांपैकी एक आहेत.  त्या अतिशय कष्टाने जीवन जगत आहेत. वय होऊन देखील प्रामाणिकपणा निष्ठा आणि जिद्दीने मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्या अतिशय कष्टमय जीवन जगताना दिसून येतात. वेळोवेळी स्वतःच्या वागण्यातून त्यांनी आपुलकी, माणुसकी, ममत्व, मातृत्व, वात्सल्य दाखवून दिले आहे. संपूर्ण परिसरात असलेल्या विविध गावातील जनतेला याची माहिती आहे. अशा कष्टकरी गोरगरीब असणाऱ्या आजीबाई शांता परशुराम गावडे  यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. अशावेळेला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने हातभार लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जिने असंख्य लोकांना आधार दिला, तिचे घर उभे करण्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन समाजातल्या मान्यवर व्यक्तींनी केले आहे. 

  • BANK NAME : KARNATAKA VIKAS GRAMEENA BANK
  • BANK BRANCH NAME : UCHAGAOAN, TALUKA BELGAUM 
        (CODE NO. : 2 212 )
  • ACCOUNT NAME  :  SHANTA PARASHURAM GAVADE
  • ACCOUNT NUMBER : 8900 3165684
  • MICR NUMBER - 
  • IFSC CODE NO. :   KVGB0002212 
  • ADDHAR CARD NO. : 385247406563 

  • ADDRESS : 
  • Name - SMT. SHANTA PARASHURAM GAVADE 
  • # H.NO.,VENGURLA ROAD BACHI NEAR BUS STOP, POST - TURAMURI TALUKA  & DISTRICT BELGAUM.  Pin Code No. 591128